मंदीरातील नित्यविधी
महाघंटेचा गजर झालेनंतर पहाटे ४.०० वाजता मंदीराचे दक्षिण व उत्तर दरवाजे उघडण्यात येतात.त्यानंतर पहाटे ५ ते ६ या वेळात क्षींची मुखभार्जन व पाद्दपूजा त्या नंतर काकड आरती होते.सकाळी ८ ते ९ यावेळेत श्री महाभिषेक व ९ ते १० या वेळेत श्रींना पोषाख चढवला जातो.
श्रीच्या नित्यपूजेचे वैशिष्ट असे की,श्रीची दिवसातून तिनदा वेगवेगळी पूजा बांधण्यात येते सकाळी १० ते ३ यावेळेत खडी दूपारी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत बैठी रात्री साधी सकाळी १० ते ३ वेळेत खडी पूजा (उभी) बांधणेत येते.त्यानंतर १० ते १२ यावेळेत धूपारती होते.
दुपारी ३ वाजता श्रींचे दूपारचे स्नान व त्यानंतर बैठी पूजा त्यानंतर रात्री सुर्यास्तानंतर दोन तास धुपारती.रात्री धुपारतीनंतर श्रींची साधी पूजा बांधली जाते.त्यानंतर श्रींची मूखमार्जन व पाद्द पूजा होते व त्यानंतर शेजेवरची शेजारती होते व रात्री ठिक ११.०० वा.मंदीर बंद होते.
वरील नित्यकार्यक्रमामध्ये नवरात्र आणि कार्तिक स्नानाच्या महिन्यात बदल होऊन मंदिर ३ वाजता उघडते.सकाळचे महाभिषेक ५ ते ६ वेळेत होतो.

shri jotiba aarati and gabarathil photos
and aarati uaplabd asalesh patvine hi vinanti