षष्ठी यात्रा
या तीर्थक्षेत्राची दुसरी मोठी व महत्वाची यात्रा म्हणज षष्ठीयात्रा.या यात्रेला अध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे.ही यात्रा म्हणजे रत्ना सुरावरील आदीमाया आदिशक्ती चर्पटअंबेचा विजय सोहळा होय.याचदिवशी चर्पट अंबेने मैनगिरीचा राक्षसराज व अत्यंत बलशाली रत्नासुराचा मध्यरात्री वध केला.
या समर प्रसंगी क्षी आदीमाया चर्पटअंबेने अत्यंत विशाल असे महिषासुर मर्दिनी असे दुर्गेचे प्रचंड रूप धारण केले आणि रत्नासुरांचा वध केला दुर्गेचे अतिविक्राळ असे भयंकर रूप पाहून रत्नासुराचे अवसान गळाले व तो म्हैसा (रेडा) होऊन मैनागिरीच्या पठारावर सैरावैरा धावू लागला आणि शेवटी मैनागिरीच्या पश्चिमेकडील पायथ्याशी उडी घेऊन पळून जाऊ लागला तेव्हा आदीमाया चर्पटअंबेने अष्टभुजा रणचंडी दुर्गा होऊन म्हैशारूपी रत्नासुराचा त्रिशुलाने वध केला.तेव्हा रत्नासुर मूळ स्वरूपात प्रकट झाला.तेव्हा आदिशक्तीने त्याची बाबरझोटी (मस्तकीचा केशकलाप) धरून खड्गाने त्याचा वध केला तेव्हा रत्नासुराने भुई (जमीन) चावून प्राण सोडला तो दिवस क्षावण षष्ठीचा व समय होता मध्यरात्रीचा त्यावेळी रत्नासुराने आपले चिरकाल स्मरण राहावे याकरीता वर मागितला त्यावेळी केदारनाथांनी रत्नासुराला मैनागिरीला रत्नागिरी पर्वत (रत्नांचा डोंगर) म्हणून ओळखतील व तुझे चिरंतर स्मारक मजपुढे राहील असा वर दिला.तेव्हापासुन मैनागिरी पर्वताला रत्नाद्री म्हणजेच रत्नांचा डोंगर म्हणून रत्नागिरी असे म्हणतात.
याचवेळी आदिशक्तीचे महाकाली रणचंडी दुर्गेचे विक्राळरूप पाहून नाथांचे भैरवसैन्य व शक्ती सैन्य मूर्च्छित पडू लागले.तेव्हा नाथांनी सर्व तेहतीस कोटी देवगण ऋषी गणासहीत आदिशक्तीला आपले मूर्तिमंत कालीचे भयंकर रूपे आवरावे आणि सात्विक सोज्वळ रूप धरण्याची विनंती केली.आदिशक्तीने चर्पट अंबेने असुर रक्ताने आपल्या सर्वांगाचा दाह होत आहे.तो शांत करा मग मी माझ्या मूळ स्वरूपात प्रकट होईन असे सांगितले.तेव्हा केदारनाथांनी शितलता व थंडावा देणऱ्या दूर्वा,लिंबे,बेल,सौंदळ वाळायुक्त शीतल जलधारेने आदिशक्तीचा अंगाचा दाह शांत केला.तेव्हा चर्पटअंबा आपल्या मूळ सात्वीक वात्सल्यरूपी मायेच्या रूपात प्रकट झाली आणि मूर्च्छित व गतप्राण भैरव सैन्यावर कृपाकटाक्ष टाकला तेव्हा सर्व सैन्याने साजीवंत होऊन आईचा जयजयकार केला. यावेळी नारदासहीत सर्व देवगणाने नाथाच्या हस्ते चर्पटअंबेची शोडषोपचार पूजा केली.आणि आईने सर्व सामान्य भक्तांची संसाररूपी दाह कमी करून वात्सल्यरूपी वरदहस्त ठेवावा अशी करूणा भाकली.
आजही क्षावण षष्ठीदिवशी आदिशक्ती चर्पटअंबा बेल,लिंबू,दूर्वायुक्त शितल वनस्थीनयुक्त पुजा बांधली जाते यादिवशी मंदीरात रात्रभर धूपारती चर्पटअंबेची शोडषोपचार पुजा केली जाते. यावेळी भाविक चर्पटअंबेस भवतापांच्या दाहक चटक्या पासून सुटका कर अशी साकडे घालतात.यावेळी भाविकांना पुजारी आईचा आशिर्वाद म्हणून लिंबुयुक्त श्रीफळ देतात.श्रीफळ केवळ याच क्षावणषष्ठीस देतात.
